यंदा जिल्ह्यात सरासरीच्या दहा टक्के जादा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:28 AM2019-07-31T01:28:47+5:302019-07-31T01:29:00+5:30

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे.

 This year, the district receives 10 percent more rainfall | यंदा जिल्ह्यात सरासरीच्या दहा टक्के जादा पाऊस

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या दहा टक्के जादा पाऊस

Next

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. बारा तालुक्यांमध्ये सरासरी दीडशे टक्के, तर कळवण, देवळा, नांदगाव या तीन तालुक्यांमध्ये ७० टक्केच पाऊस झाला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने झडी लावली असून, गेल्या पाच दिवसांमध्ये सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या खालोखाल नाशिक शहर व परिसराला पावसाने झोडपून काढतानाच दिंडोरी, चांदवड, कळवण, बागलाण, निफाड, सिन्नर या तालुक्यांनाही जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. भात सोडून अन्य पिकांच्या पेरण्या जवळ जवळ पूर्ण झाल्या असून, भाताची आवणी जोरात
सुरू झाली आहे. त्यासाठी सध्याचा
पाऊस सर्वाधिक उपयोगी असल्याने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी तालुक्यात भरपावसात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.  जिल्ह्णात जुलै महिन्यात आजवर ५६७१ मिलिमीटर पावसाची सरासरी राहिली आहे. यंदा मात्र ८३८६ मिलिमीटर पाऊस जुलैच्या अखेरच्या दिवसापर्यंत नोंदविला गेला आहे. त्यातही जिल्ह्णाच्या वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस जुलै महिन्यातच पडून गेला आहे. गेल्या वर्षी ३० जुलै रोजी जिल्ह्णात ५५ टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊन दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागली होती.
पावसाच्या सातत्याने जिल्ह्णातील नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जवळपास सात धरणांनी धोक्याची पातळी गाठल्याने त्यातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. परिणामी गोदावरी, कादवा, दारणा यांसारख्या नद्यांना पूर आला असून, काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
जुलै महिन्यातील एकूण पाऊस (कंसात गेल्या वर्षाचा पाऊस)
नाशिक - ४७५.९ (४२९.३)
इगतपुरी- २०५६.० (२१६८.०)
दिंडोरी - ४४६.० (२६५.०)
पेठ - ११५०.३ (१५५२.७)
त्र्यंबक - १५५३.० (१०८१.०)
मालेगाव- २३१.० (१७५.०)
नांदगाव - ७९.० (११०.०)
चांदवड- १७२.० (२०९.०)
कळवण - १६५.० (२४९.०)
बागलाण - २४८.० (१९०.०)
सुरगाणा - ९८५.१ (१२८१.०)
देवळा- १४५.६ (१७७.०)
निफाड- २२८.८ (७६.६)
सिन्नर- २७१.० (२३६.९)
येवला - १८०.२ (२४७.६)

Web Title:  This year, the district receives 10 percent more rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.