जाचक अटींमुळे यंदा टिपऱ्यांचा खणखणाट फिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:28 AM2018-10-08T01:28:39+5:302018-10-08T01:29:04+5:30
नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही बाजारातील उत्सवाची रौनक फिकी पडली आहे. विशेष म्हणजे या नियमांचा फटका नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिराच्या पारंपरिक यात्रेलाही बसल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामदेवतेच्या यात्रेलाही फटका : नवरात्र मंडळांची संख्या घटली
नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही बाजारातील उत्सवाची रौनक फिकी पडली आहे. विशेष म्हणजे या नियमांचा फटका नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिराच्या पारंपरिक यात्रेलाही बसल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे अंगुलीनिर्देश करून गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रोत्सवालाही कायद्यात करकचून आवळून टाकले असून, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे मंडप उभारणीस मज्जाव, रस्त्याच्या एकतृतीयांश जागेतच मंडपाची उभारणी, मंडप उभारणीसाठी जागा मालक, महापालिका, पोलिसांची अनुमती, धर्मदाय आयुक्तांकडे मंडळांची नोंदणी, अग्निशामक दलाची ना हरकत अशा सुमारे वीस प्रकारच्या विविध जाचक अटी नियमांमध्ये नवरात्रोत्सव बांधून टाकला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शासकीय अनुमती घेताना नाकीनव आलेल्या सार्वजनिक मंडळांनी यंदापासून नवरात्रोत्सव साजरा न करता नियम, अटींच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी ‘घट’ विसर्जनाचा अंतिम निर्णय घेऊन टाकला आहे.
त्यामुळे एरव्ही दरवर्षी मंतरलेल्या नऊ दिवसांत चौकाचौकात मध्यरात्री पर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर थिरकणाºया पावलांसह टिपºयांचा होणाºया खणखणाटाला मुकणार आहे. तपासणी पथकाची नियुक्तीनवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे, संस्थांकडून उभारण्यात येणारे मंडप, पेंडाल नियमानुसार आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाशिक शहर व ग्रामीण भागासाठी तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. नाशिक शहरासाठी प्रांत अधिकारी व महापालिकेच्या सहायक आयुक्त, विभागीय अधिकारी तसेच सहायक पोलीस आयुक्त यांची तर मालेगाव महापालिका क्षेत्रासाठी प्रांत अधिकारी, मनपा उपायुक्त यांची तर ग्रामीण भागासाठी ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना मंडळांनी उभारलेल्या मंडपाबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. कालिका यात्रा फिकीदरवर्षी नवरात्रोत्सवात गजबजणारी कालिका देवी यात्रा यंदा पोलीस व महापालिकेच्या जाचक कायद्यामुळे फिकी पडली आहे. एरव्ही दरवर्षी पितृपक्षापासूनच जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील कालिका मंदिराच्या दुतर्फा विक्रेते, व्यावसायिकांची दुकाने थाटण्यास सुरुवात होत, स्थानिक व परजिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक या यात्रेच्या निमित्ताने दहा दिवस चांगला व्यवसाय करीत तर नाशिककरांनाही या यात्रेचे विशेष आकर्षण असल्यामुळे ग्रामदेवतेच्या या यात्रेला वेगळेच महत्त्व प्राप्त होत होते.
गेल्या वर्षी पोलिसांनी रस्त्यावर दुकाने थाटण्यास विरोध केल्याने अखेर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करून ऐनवेळी व्यावसायिकांना दुकाने मांडण्यास अनुमती देण्यात आली. यंदा मात्र कालिका यात्रेच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्यामुळे नवरात्रोत्सवाचा रंगच फिका पडला आहे.