यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:38 AM2018-10-25T01:38:18+5:302018-10-25T01:38:53+5:30

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत.

 This year, even in Diwali, 'China Made' will hit | यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा

यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा

Next

नाशिक : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत.
यंदाही बाजारपेठेत चिनी वस्तूंना नाकारून रोषणाईसाठी स्वदेशी वस्तूंचे वर्चस्व दिसून येत आहे. मेनरोड, पंचवटी, रविवार पेठ आदी शहरातील मुख्य बाजारपेठांसह शहरातील सर्व उपनगरांमध्ये रोषणाई साहित्याची रेलचेल दिसून येत आहे. काही वस्तूंसाठी स्वदेशी तर काही वस्तूंसाठी चिनी बनावटीच्या वस्तूंना नाशिककरांची प्रथम पसंती मिळत आहे. त्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लायटिंगच्या माळा, आकाशकंदील, पणत्यांची माळ, फटाके, हॅलोजन ट्यूब, आबालवृद्धांसाठीचे गिफ्ट आयटम्स, फळे, फटाके फोडण्याची बंदूक आदि वस्तूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. काही वर्षांपूर्वी कमी दर, चमकदमक असलेले आवरण, आवडीचे रंग या वैशिष्ट्यांमुळे चायना मेड वस्तू नाशिककरांना आकर्षित करण्यात यशस्वी होत होत्या. मात्र आता स्वदेशी वस्तूंकडेच नाशिककरांचा ओढा वाढला आहे. यामुळे स्थानिक कारागिरांनी मेहनतीने केलेल्या वस्तूंना न्यायही मिळत आहे. 
गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. आमच्या दुकानात सध्या आकाशकंदील, लायटिंग माळा, पणत्या, हॅलोजन यात स्वदेशी बनावटीच्या प्रकारांना मागणी जास्त आहे.  - भावेंद्र जावळे, व्यावसायिक
वाढती महागाई व त्या तुलनेत तुटपुंजी आर्थिक आवक बघता जो ब्रॅँड कमी दरात वस्तू देईल ती घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण तरीदेखील गेल्या ३-४ वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या वस्तूच घ्याव्याशा वाटत आहे. त्यामुळे दर्जा, किंमत, वापरण्यास सुलभता हे सारे बघून गरिबातल्या गरिबालाही ती वस्तू घ्यावीशी वाटेल, असा विचार उत्पादकांनी करायला हवा. - रवींद्र काळकर, ग्राहक
असे आहेत तुलनात्मक दर
वस्तूचे नाव भारतीय दर चिनी दर
आकाशकंदील २५० ते १००० रु. १०० ते ४५० रु.
लायटिंग माळ १३० ते ३५० रु. २० ते ३५० रु.
एलइडी फोकस ५० ते ७० रु. ५० ते ६०० रु.
पणत्यांची माळ —— १०० ते १२५ रु.
हॅलोजन ट्यूब ९० ते ६५० रु. ८ ते ६० रु.
फटाक्याची बंदूक २५ ते ५० रु. १२ ते ४० रु.

Web Title:  This year, even in Diwali, 'China Made' will hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.