गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:47 AM2018-04-03T01:47:40+5:302018-04-03T01:47:40+5:30

गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

 This year, the increase in suicides by farmers in comparison to last year | गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

Next

नाशिक : गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.  गेल्या वर्षी जिल्ह्णात सर्वत्र समाधानकारक पर्जन्यमान होऊन खरीप हंगामाची पीक पैसेवारी ५० पैशांहून अधिक नोंदविली गेली होती. शिवाय जिल्ह्यातील धरणेही शंभर टक्के फुल्ल होऊन नद्या, नाले दुथडी भरून वाहिले त्यामुळे शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आल्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यातच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजना लागू करून कर्जदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले. नाशिक जिल्ह्णातील सुमारे ९० हजारांच्या आसपास शेतकºयांना याचा लाभ मिळाला. असे असतानाही शेतकºयांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना सन २०१७ मध्ये डिसेंबरअखेर १०४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. तोच कित्ता चालू वर्षीही सुरू असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्णात २३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत वर्षाच्या तुलनेत सातने संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या काळात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र संख्या २३ वर पोहोचली आहे. चालू वर्षी जानेवारीत ९, फेब्रुवारी ४ व मार्च महिन्यात दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने प्रशासन यंत्रणाही हादरली आहे.
घोषणा हवेतच
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता कर्जमाफीची मात्रा शेतकºयांना फारशी लागू पडली नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने घातलेले थैमान, गारपीट, कापसावरील बोंडअळी यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, कांद्याच्या भावात दरदिवसा घसरण होऊ लागली आहे तर मक्याचे अमाप पीक येऊनही पाहिजे त्याप्रमाणात दर न मिळाल्याने नाराजी आहे. द्राक्षपिकावर हवामानाचा परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जवळचा मार्ग म्हणून आत्महत्येला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या रोखण्याची जिल्हा प्रशासनाची घोषणाही हवेतच विरली आहे.

Web Title:  This year, the increase in suicides by farmers in comparison to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.