कृषी विभागामार्फत यंदा खरीप पिकांची उत्पादनवाढ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:59+5:302021-06-05T04:10:59+5:30

नांदगाव : तालुक्यात वळवाच्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुक्यात ज्वारी, बाजरी, ...

This year kharif crop production increase campaign through agriculture department | कृषी विभागामार्फत यंदा खरीप पिकांची उत्पादनवाढ मोहीम

कृषी विभागामार्फत यंदा खरीप पिकांची उत्पादनवाढ मोहीम

Next

नांदगाव : तालुक्यात वळवाच्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुक्यात ज्वारी, बाजरी, कपाशी या पीक पद्धतीत बदल होत आहे. सरासरी उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला असून, बांधावर जाऊन आधुनिक तंत्राने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

गेली काही वर्षे मका पिकाकडे शेतकरीवर्गाचा कल वाढत असून, गेल्या वर्षी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २७ हजार हेक्टर असताना यंदा मका खरिपात तीस ते बत्तीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड अपेक्षित आहे. मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी तालुक्याची सरासरी उत्पादकता गेल्या वर्षी ३५ क्विंटल प्रतिहेक्‍टर आली आहे. येत्या हंगामात मका पिकात ५ ते ७ क्विंटल उत्पादन वाढ होण्यासाठी कृषी विभागाने उत्पादनवाढीचे सूत्र निश्चित केले आहे. यामध्ये अझोटोबक्टर, पी. एस. बी. या जैविक खतांची बीज प्रक्रिया, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताची मात्रा, बी. बी. एफ. यंत्राद्वारे मका पिकाची पेरणी, लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये पक्षी थांबे व कामगंध सापळ्यांचा वापर निश्चित केला आहे.

---------------------------

यंदा मका व कपाशी यांचे सरासरी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीतल्या संशोधनातून मिळालेल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग शेतकरीवर्गाने करावा. यासाठी संपूर्ण कृषी विभागाची टीम बांधावर जाऊन काम करत आहे.

- जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव

(०४ नांदगाव १)

===Photopath===

040621\04nsk_8_04062021_13.jpg

===Caption===

०४ नांदगाव १

Web Title: This year kharif crop production increase campaign through agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.