यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:41 AM2019-05-10T00:41:31+5:302019-05-10T00:42:06+5:30
नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हा
कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.
हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळयंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रियनाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.