यंदा कांदा लागवड महिनाभर उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:42 PM2019-12-29T22:42:22+5:302019-12-29T22:42:34+5:30
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी उन्हाळ कांद्याच्या लागवड यंदा मात्र दीड महिना लांबणीवर पडली. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे. सध्या उपलब्ध रोपात कांदा लागवड करण्याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून, शेतकरी कांदा लागवडत व्यस्त आहे.
महेंद्र पगार ।
कुकाणे : दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी उन्हाळ कांद्याच्या लागवड यंदा मात्र दीड महिना लांबणीवर पडली. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे. सध्या उपलब्ध रोपात कांदा लागवड करण्याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून, शेतकरी कांदा लागवडत व्यस्त आहे.
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून काही प्रमाणात आदिवासी मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत आहेत. तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मजुरीचे दरही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रुपये रोज असा दर आहे. बियाणे, खते आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे. यंदा कांद्याला विक्रमी बाजारभाव असल्यामुळे इतर पिकांपेक्षा चार महिन्यांच्या कांदा पिकाची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे, परंतु शेतकºयांना अधूनमधून पडणाºया ढगाळ हवामानामुळे औषधफवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकºयांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या एक एकर लागवडीसाठी १३ ते १५ हजार रुपये मजूरवर्ग घेतात. एक एकरासाठी साधारणत: ८० हजाराच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होतो. एवढा
खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार लागवड
यंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ६० टक्के कांदा रोपे खराब झाल्यामुळे शेतकºयांनी एक-दोन नाही चार-चार वेळा कांद्याची रोपे टाकली, दर आठवड्याला फवारणी केली तरीही रोपे चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार आहे. सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. अनेक शेतकºयांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकल्यामुळे यंदा कांदा लागवडीला उशीर होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून, कधी कडक ऊन तर कधी ढग दाटून येत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. अवकाळी पावसाचे सावट असल्याने पिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.