यंदा पर्युषण पर्व साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:15 PM2020-08-17T22:15:51+5:302020-08-18T01:09:44+5:30
चांदवड / लासलगाव : ऋषिपंचमी-पासून (दि.२३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने चांदवड आणि लासलगाव येथील जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. या काळात भाविकांसाठी सामाजिक अंतर राखून दर्शन दिले जाणार असल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले आहे.
उपक्रम : चांदवड, लासलगावी भाविकांसाठी दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड / लासलगाव : ऋषिपंचमी-पासून (दि.२३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने चांदवड आणि लासलगाव येथील जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. या काळात भाविकांसाठी सामाजिक अंतर राखून दर्शन दिले जाणार असल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले आहे.
चांदवड येथे समरथ-गच्छाधिपती प.पू. श्री. उत्तममुनीजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती साध्वी प.पू. श्री. ताराजी म.सा., प.पू. श्री. निताजी म.सा., प.पू. श्री. अंजलीजी म.सा., प.पू. श्री. प्रांजलजी म.सा. आदींचे चांदवड शहरात आगमन झाले आहे. रेणुकानगर येथील सुधर्मा आराधना केंद्र येथे चतुर्मासानिमित्त त्यांचे वास्तव्य आहे, तर पर्यषण पर्वात प्रवचनाचे कुठलेही कार्यक्रम आयोजित केले नाही. केवळ जैन समाज बांधव व भगिनी यांना दर्शनासाठी येण्याची मुभा आहे, तीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच कोणतेही धार्मिक प्रवचन होणार नसल्याचे समरथ- गच्छाधिपती या जैन बांधवांच्या वतीने सांगितले तर त्यांची आहार-विहाराची व्यवस्था जैन समाज बांधवाच्या घरी जाऊन फिजिकल डिस्टन्सिंग पालन करून केली जाणार आहे.
दरम्यान, श्री वर्धमान-स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या केंद्रात व श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघाच्या स्थानकात कुणीही साध्वी, मुनी आलेले नाही.लासलगाव येथील जैन स्थानकामध्ये चतुर्मासानिमित्त प.पू. डॉ. प्रियदर्शनाजी म.सा., प.पू. डॉ. प्रणवदर्शनाजी म.सा., प.पू. विरलदर्शनाजी म.सा. व प.पू. इशदर्शनाजी म.सा. यांचे लासलगावी आगमन झाले आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे प्रवचनाचा मोठा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.चतुर्मासात येणाऱ्या जैन मुनींबाबत भाविकांना उत्सुकता असते. त्यांचे मार्गदर्शन आणि संत सहवास हा फार मोठा ठेवा मानला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे अशा उपक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कार्यक्रम होणारच नसल्याचे सांगण्यात आले.