यंदा सार्वजनिक होलिकोत्सवाला मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:10+5:302021-03-24T04:14:10+5:30
शासनाने सार्वजनिक स्वरूपाच्या सर्वच कार्यक्रमांना मनाई केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या होळीसह अनेक उत्सवावर निर्बंध ...
शासनाने सार्वजनिक स्वरूपाच्या सर्वच कार्यक्रमांना मनाई केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या होळीसह अनेक उत्सवावर निर्बंध येणार आहेत. मागीलवर्षी देखील सण, समारंभांवर कोरोनाचे सावट होते. शहरात खासगी तसेच सार्वजनिक होळीचा सण साजरा केला जातो. रंगपंचमीदेखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. नाशिकमधील रहाडीतील रंगोत्सव राज्यात ओळखला जातो. यंदा रंगपंचमीदेखील केारोनाच्या विळख्यात आली आहे.
कोणत्याही कारणास्तव गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याने नागरिकांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आदेश काढण्यात आलेले आहेत. आता पेालीस प्रशासन, तहसीलदार यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात गर्दी जमविली तर थेट कारवाई केली जाणार आहे.