यंदा श्रावण २९ दिवसांचा ; मंदिरात प्रवेश मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:43+5:302021-07-16T04:11:43+5:30
त्र्यंबकेश्वर हे शिवाचे मोठे स्थान असल्याने श्रावण मासात मंदिर गजबजलेले असते. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात दर श्रावणी ...
त्र्यंबकेश्वर हे शिवाचे मोठे स्थान असल्याने श्रावण मासात मंदिर गजबजलेले असते. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात दर श्रावणी सोमवारी तर भाविकांची मोठी गर्दी होतेच शिवाय बारमाही या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची वर्दळ असते. त्र्यंबकेश्वर शहराचे सारे अर्थकारण या मंदिरावर अवलंबून आहे. या मंदिरावर अवलंबून असलेल्या पूजा साहित्यापासून ते खाद्यपदार्थांच्या हॉटेल्स, रेस्टॉरंटपर्यंत कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासनाच्या आदेशानुसार मंदिराचे दरवाजे सामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. केवळ पुजाऱ्यांनाच नित्य पूजाविधीसाठी प्रवेश दिला जात आहे. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या दानपेटीत जमा होणारे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे मंदिराचा कारभार कसा चालवायचा याबाबत संस्थानपुढे प्रश्नचिन्ह आहे. श्रावण मासात तर संपूर्ण शहर गजबजलेले असते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी तर प्रचंड गर्दी असते. ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्यासाठी लाखो शिवभक्त हजेरी लावत असतात. त्यातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. शासनाने अजूनही मंदिर खुले करण्याबाबत काहीही निर्णय न घेतल्याने यंदाही मंदिर उघडेल की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. यंदा श्रावण २९ दिवसांचा आहे. ९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावणात तरी मंदिर खुले होऊन व्यवसायाचे दरवाजे किलकिले होतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे.
इन्फो
९ ऑगस्टपासून श्रावण
८ ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. ९ ऑगस्टपासून श्रावण मासास प्रारंभ होणार आहे. श्रावण मास हा सण-उत्सवांचा महिना असल्याने व्रत-वैकल्यांसह विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते शिवाय धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केलेले असते. या काळात मंदिर परिसरात थाटलेल्या पूजा साहित्य, फूल विक्रेत्यांपासून ते विविध धार्मिक पुस्तके, साहित्य या दुकानांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मागील वर्षीही पहिल्या लाटेत श्रावण मासात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होते की काय, याचे सावट आहे.
इन्फो
श्रावणी सोमवार
पहिला - ९ ऑगस्ट
दुसरा - १६ ऑगस्ट
तिसरा - २३ ऑगस्ट
चौथा - ३० ऑगस्ट
कोट.....
वास्तविक ज्या ठिकाणी कोरोनाचा कहर कमी आहे, अशा ठिकाणचे धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वरला रुग्णसंख्येत घट हाेत असताना मंदिर उघडणे गरजेचे आहे. दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यात प्रसाद, नारळ, साखर फुटाणे, लाह्या कुरमुरे,
बत्तासे, रेवडी, राजगिरा, चिक्की, लाडू व इतर प्रसाद मालापासून उत्पन्न मिळत असते. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिर बंद राहिल्यास आमचे उत्पन्न बुडणार आहे. आषाढी एकादशी झाल्यावर मंदिरे उघडतील, अशी आशा आहे.
- श्यामराव गंगापुत्र, प्रसाद विक्रेता, त्र्यंबकेश्वर
कोट....
श्रावण मास हा तर फुलविक्रेत्यांसाठी सुगीचा महिना असतो. मागील वर्षी देखील व्यवसायापासून आम्ही वंचित राहिलो. यावर्षी लवकरात लवकर मंदिर उघडले नाही तर आत्महत्या शिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. आमची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. एक तर फुलांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. अशात व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. शासनाने आता मंदिरे खुली केली पाहिजेत.
- दिनेश पाटील, फूल विक्रेता, त्र्यंबकेश्वर
फोटो- १५ श्यामराव गंगापुत्र
१५ दिनेश पाटील
150721\15nsk_17_15072021_13.jpg~150721\15nsk_18_15072021_13.jpg
फोटो- १५ श्यामराव गंगापुत्र~१५ दिनेश पाटील