यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:42 AM2019-06-14T00:42:26+5:302019-06-14T00:42:44+5:30

गतवेळी समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज अपुऱ्या पावसामुळे फोल ठरल्यानंतर खरिपाचे लागवड क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टरने घटले होते. यंदा मात्र हवामान खात्याने सरासरीच्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. सुमारे ६ लाख ३३ हजार ७२१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीही मशागतीसाठी तयार ठेवल्या. तथापि, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

This year, there is an increase in the area of the Kharif area | यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ

यंदा खरिपाच्या क्षेत्रात गतवेळपेक्षा वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : सहा लाखांहून अधिक हेक्टरवर लागवड

नाशिक : गतवेळी समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज अपुऱ्या पावसामुळे फोल ठरल्यानंतर खरिपाचे लागवड क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टरने घटले होते. यंदा मात्र हवामान खात्याने सरासरीच्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. सुमारे ६ लाख ३३ हजार ७२१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीही मशागतीसाठी तयार ठेवल्या. तथापि, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कृषी विभागाने यंदा खरिपाच्या लागवडीची तयारी पूर्ण केली असून, त्यासाठी बी-बियाणे व खतांची मागणीही शासनाकडे यापूर्वीच नोंदवून पुरेसा साठादेखील खरिपापूर्वीच करण्यात आला आहे. यंदा हवामान खात्याने प्रारंभी समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला व त्यानंतर पुन्हा सरासरी इतका पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केल्याने शेतकºयांमध्ये गेल्या वर्षाप्रमाणे धास्ती निर्माण झाली आहे. सन २०१८-१९ मध्ये जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात मान्सूनचे जिल्ह्णात आगमन झाले असले तरी, तत्पूर्वी पाऊस चांगला पडणार असल्याचे भाकिते वर्तविण्यात आल्याने कृषी विभागाने सहा लाख ७८ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात पावसाने चांगलीच दडी मारल्याने ६ लाख ८ हजार हेक्टरवरच कशीबशी पेरणी होऊ शकली तर रब्बीचे नियोजन पावसाअभावी पुरते कोलमडून पडले होते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षाचा अंदाज व पावसाची शक्यता पाहून कृषी विभागाने नियोजन केले असून, त्यात ६ लाख ३३ हजार ७२१ हेक्टरवर पेरणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
खरीप पिकांमध्ये भात,
बाजरी, मका, ज्वारी याप्रमुख पिकांबरोबरच तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीनचाही समावेश आहे. जिल्ह्णात ज्वारी, बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटत चालले असून, त्याची जागा मक्याने घेतली आहे. यंदा मक्याची लागवड सव्वादोन लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे.
पाऊस लांबल्याने पेरणीला होणार विलंब
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, साधारणत: मे महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर बºयापैकी मशागत केलेल्या जमिनीची धूप होण्यास त्याचबरोबर जमिनीची वाफ निघण्यास मदत होते. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस झाल्यावरच पेरणी केली जाते. परंतु यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसावर भरवसा ठेवून शेतकरी पेरणीचे धाडस करण्यास धजावत नसून, लागोपाठ दोन दिवस पावसाने संततधार लावल्यानंतर जमिनीची धूप भरून निघाल्यानंतरच पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.

Web Title: This year, there is an increase in the area of the Kharif area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.