यावर्षीही साडेनऊ हजार वह्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:35 PM2019-06-18T23:35:09+5:302019-06-19T01:05:58+5:30
महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने शासकीय कन्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते करण्यात आले.
नाशिक : महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने शासकीय कन्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना शीतल सांगळे यांनी, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकीय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून, या शाळेत गोरगरीब कुटुंबातील नाशिक शहरातील मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने या मुलींना शैक्षणिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकामी औषधनिर्माण अधिकारी संघटनेने सातत्य ठेवल्याबद्दल कौतुक केले. शासकीय कन्या विद्यालयास कर्मचारीवृंदासह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक डॉ. साळुंके यांनी केले. औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे सल्लागार जी. पी. खैरनार यांनी, जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्याची विनंती केली. कार्यक्रमास प्रदीप राठी, सचिन मालेगावकर, विजय देवरे, एफ. टी. खान, हेमंत राजभोज, दिलीप बच्छाव, जनार्दन सानप, उमेश भावसार, प्रेमानंद गोसावी, किशोरकुमार गव्हाळे, प्रशांत कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता साठे यांनी, तर संगीता सोनार आभार यांनी मानले.
शाळेत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ७३.३३ टक्के लागलेला असून, आचल केशवचंद ओसवाल या विद्यार्थिनीस ८५.२० टक्के गुण मिळाले. शाळेत इयत्ता दहावीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींचा गौरव यावेळी करण्यात आला.