यंदा मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:33+5:302021-05-31T04:11:33+5:30
पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि. ३०) पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसूर आणि कुसमाडी शिवारात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ...
पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि. ३०) पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसूर आणि कुसमाडी शिवारात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास असून, यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी येवल्याच्या दिशेने येणार आहे. त्यादृष्टीने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या साफसफाईचे काम तातडीने सुरू आहे. मात्र अद्याप रेल्वे क्रॉसिंगचे काम राहिले आहे. या कामास रेल्वेची परवानगी मिळाली असून, या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकार्यांसमवेत केली.
इन्फो
रेल्वे क्रॉसिंग कामाबाबत सूचना
मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून, यंदाच्या पावसाळ्यात कुठल्याही परिस्थितीत डोंगरगावपर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने कालव्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून महिनाभराच्या आत कुसमाडी परिसरातील रेल्वे क्रॉसिंगचे काम करण्यात यावे. तसेच कालवा परिसरातील शेतकर्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करून देण्याची यावी, असे आदेशही भुजबळ यांनी अधिकार्यांना दिले.
फोटो- ३० भुजबळ मांजरपाडा
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसुर आणि कुसमाडी शिवारात पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.
===Photopath===
300521\30nsk_37_30052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० भुजबळ मांजरपाडापुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसुर आणि कुसमाडी शिवारात पाहणी करतांना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.