यंदाचा अर्थसंकल्प सर्वांसाठी वैशिष्ट्यपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:32+5:302021-02-14T04:14:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : यंदाचा अर्थसंकल्प हा अनेकविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी तयार झाला असून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : यंदाचा अर्थसंकल्प हा अनेकविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी तयार झाला असून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन येथील अर्थतज्ज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट व मामको बँकेचे संचालक सतीश कासलीवाल यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
कासलीवाल यांनी या व्याख्यानातून अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींना स्पर्श करताना खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक मुद्द्यांच्या संदर्भात सखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मितेश कलंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वाचनालयाच्या कोषाध्यक्षा डॉ. कल्पना करवा यांनीही मनोगत व्यक्त केले. वाचनालयाचे संचालक पोपटराव देशमुख व विवेक पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या प्रफुल्ल राजेंद्र अग्रवाल यांचा सन्मान सतीश कासलीवाल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला रेखा उगले, सुरेखा सोनवणे, प्रमोद भावसार, दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सचिव डॉ. विनोद गोरवाडकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. दीपक अहिरे यांनी केले तर पूनम सोनपसारे यांनी आभार मानले.