गेल्या वर्षाच्या पीक नुकसानीची यंदा भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:24 AM2018-08-14T01:24:12+5:302018-08-14T01:24:58+5:30
गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी यंदा २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्णातील २६ हजार शेतकºयांना या रकमेचे वाटप केले जाणार आहे.
नाशिक : गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी यंदा २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्णातील २६ हजार शेतकºयांना या रकमेचे वाटप केले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामार्फत सदरची आर्थिक मदत गेल्या वर्षीच शासनाने जाहीर केली होती. त्यात प्रामुख्याने अतिवृष्टी वा अवकाळी पावसाने शेती पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांनाच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या काळात नाशिक विभागातच अनेक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावून नेला होता. एप्रिल महिन्यातील पावसाने खळ्यावर काढून ठेवलेल्या शेतकºयांच्या उन्हाळ कांद्याचे अतोनात नुकसान केले होते. त्याचबरोबर उशिराच्या द्राक्षबागांचेही त्यामुळे नुकसान झाले होते. सप्टेंबर व आॅक्टोबरच्या पावसाने खरिपाची उभी असलेली पिके जमीनदोस्त केली होती. त्यामुळे नाशिक विभागातील ६९,४६७ शेतकºयांच्या ३३,३५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात नाशिक जिल्ह्यातील २६,८८३ शेतकºयांच्या १३,८७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.विभागासाठी ४० कोटी ५८ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे़