येवल्यात बिनशेती महसूल वसुलीसाठी अधिकारी घरोघरी

By admin | Published: March 7, 2017 12:51 AM2017-03-07T00:51:52+5:302017-03-07T00:52:03+5:30

येवला : बिनशेती प्लॉटधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मोहीम येवल्यात हाती घेण्यात आली आहे

Yehaly, unemployment revenue recovering officer's house | येवल्यात बिनशेती महसूल वसुलीसाठी अधिकारी घरोघरी

येवल्यात बिनशेती महसूल वसुलीसाठी अधिकारी घरोघरी

Next


येवला : बिनशेती प्लॉटधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मोहीम येवल्यात हाती घेण्यात आली आहे.
शहरातील बिनशेती शेतसारा वसुलीसाठी महसूल विभागाचे २४ तलाठी व पाच मंडलाधिकार यांचा समावेश असलेले पथक घरोघरी जाऊन शासनाचा महसूल गोळा करीत आहेत.
शहरामध्ये प्रचंड प्रमाणात असलेले बिनशेती प्लॉटधारकांकडे लाखो रु पयांची थकबाकी असल्याने तहसिलदारांनी या थकलेल्या महसुलासाठी तालुक्यातील सर्वच तलाठी व मंडलाधिकारी यांचा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. बिनशेती प्लॉटधारकांनी तत्काळ आपल्याकडील थकबाकी व चालू बिनशेती शेतसाऱ्याची रक्कम त्वरित भरणा करावी, असे आवाहन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले आहे.
जेव्हा सातबारा उतारा काढायची वेळ येते तेव्हाच बिनशेती पावतीचा विषय येत असल्याने अनेकांचे या बिनशेती शेतसारा भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यात येवला व अंगणगाव या दोन गावांमध्ये बिनशेती प्लॉटचे प्रमाण जास्त असल्याने खातेदार जास्त असले तरी दोन्ही गावा मिळून एकच सजा आहे व कामकाज बघण्यासाठी एकच तलाठी आहे. कामाच्या बोज्यामुळे सतत वरिष्ठांच्या नजरेत राहावे लागत असल्याने येवला सजेचा कारभार स्वीकारण्यासाठी कोणीही तलाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाने तालुक्यातील प्रत्येक मंडलाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली आहेत. हे पथक घरोघरी जाऊन सारा वसूल करून जागेवर पावती देत आहे.
नागरिकांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत अनधिकृत बिनशेती बांधकामांची पाहणीही करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Yehaly, unemployment revenue recovering officer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.