येवल्याचा फेटा जाणार सातासमुद्रापार.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 06:49 PM2019-03-06T18:49:03+5:302019-03-06T18:49:39+5:30
येवला : येवल्यातील फेटा कलावंत श्रीकांत खंदारे यांच्या बकेट लिस्ट मधील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले असून मलेशियातील एका कार्यक्र मात तेथील विविधस्तरातील मान्यवरांच्या डोक्यावर येवल्याचा फेटा मिरवणार आहे.
येवला : येवल्यातील फेटा कलावंत श्रीकांत खंदारे यांच्या बकेट लिस्ट मधील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले असून मलेशियातील एका कार्यक्र मात तेथील विविधस्तरातील मान्यवरांच्या डोक्यावर येवल्याचा फेटा मिरवणार आहे.
मलेशिया येथे ७ ते १३ मार्च दरम्यान कोकमठाण येथील अध्यात्मिक गुरु जंगलीदास महाराज यांच्या सत्संग सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्र मात येवल्याचा फेटा मलेशियाच्या विविध मान्यवरांच्या डोक्यावर श्रीकांत खंदारे यांच्या हस्ते बांधण्यात येणार असल्याने खंदारे यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीकांत खंदारे याने येवल्यातील अस्सल मराठमोळ्या फेट्याला थेट दिल्ली मुंबईपर्यंत ओळख करून दिली आहे. सहा महिन्यापूर्वीच त्याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही फेटा बांधला होता. तसेच क्रि केटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यासह अनेक सिनेकलाकार व क्रि केटपटूंना फेटा बांधलेल्या श्रीकांतने येवल्याचा फेटा सातासमुद्रापार नेण्याचे एक मनोमन स्वप्न बाळगले होते. अखेर या स्वप्नांच्या मागे धावता धावता ते प्रत्यक्षात साकारले गेले आहे. महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधण्याची कलेच्या जोरावर आजपर्यंत अनेकाना फेटा बांधून आपली स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरवणारा श्रीकांत याने अध्यात्मिक गुरु परमपूज्य जंगलीदास महाराज, परमानंद महाराज यांच्यासह मलेशियात एका सत्संग सोहळ्यास जाण्याचा मान मिळाला असून त्यानिमित्ताने मलेशिया येथे या कार्यक्र मात उपस्थित मान्यवरांना श्रीकांत खंदारे यांच्या हस्ते फेटा बांधण्यात येणार असल्याने येवल्याचा फेटा सातासमुद्रापार नेण्याचे श्रीकांतचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. (फोटो ०५ खंदारे)