येवल्याच्या दुचाकी चोराला म्हसरू ळमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:43 AM2017-10-27T00:43:50+5:302017-10-27T00:43:57+5:30

येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरुवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने या चोरट्याला ताब्यात घेतले.

Yehleela's two-wheeler stuck in Mhasruul | येवल्याच्या दुचाकी चोराला म्हसरू ळमध्ये अटक

येवल्याच्या दुचाकी चोराला म्हसरू ळमध्ये अटक

Next

नाशिक : येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरुवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने या चोरट्याला ताब्यात घेतले.
येवला शहरात मुख्य बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणांवरून मोठ्या संख्येने दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरट्यांनी येवल्यात घातलेल्या धुमाकुळाने नागरिक त्रस्त झाले असताना अखेर एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या गळाला लागला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी तपासाची सूत्रे फिरवून कमी किमतीत बनावट वाहन क्रमांक तयार करून विक्री करणाºया चोरट्यांचे ‘नाशिक-येवला’ क नेक्शन तपासण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर संशयिताने त्याच्या साथीदाराचे नाव, पत्ता आदी माहिती सांगत येवल्यामधून चोरलेल्या आठ दुचाकी दडवून ठेवलेली जागा दाखविली. पोलिसांनी सदर जागेवरून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, येवल्याच्या दुचाकी चोराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने तेथील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली असून, लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये दोन स्प्लेंडर-प्लस, एक स्प्लेंडर-प्रो, अपाचे, टीव्हीएस स्टार सिटी, शाईन, बुलेट या प्रकारच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत असून, या दुचाकी चोरट्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Yehleela's two-wheeler stuck in Mhasruul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.