शाळांच्या परिसरात ‘येलो कॅम्पेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:49+5:302021-02-17T04:20:49+5:30
नाशिक: तंबाखूमुक्तीची जनजागृती अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या शंभर मीटर त्रिजेच्या आवारात यलो लाईन कॅम्पेन शिक्षक आणि पालक ...
नाशिक: तंबाखूमुक्तीची जनजागृती अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या शंभर मीटर त्रिजेच्या आवारात यलो लाईन कॅम्पेन शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून राबविण्यात येत असून या मोहिमेचा आढावा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सन्मवय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय सन्मवय समितीच्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त गणेश परळीकर, मानसशास्त्र तज्ञ डॉ. नरेंद्र व्ही. देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, उपशिक्षणाधिकारी झोले, सहायक पोलीस निरिक्षक सचिन सावंत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ.शिल्पा बांगर, जिल्हा समुपदेशक कविता पवार, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला पाटील, सलाम मुंबई फाउंडेशन जिल्हा समन्वयक अजय चव्हाण, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे नितीन वाकळे, प्राचार्य विजय मेधने, शिक्षणाधिकारी आर. डी. बच्छाव, जी.एस.टी.चे आस्थापना अधिकारी प्रशांत जोशी, कामगार उपायुक्त कार्यालयाचे सरकारी कामगार अधिकारी जोशी, दिगंबर नाडे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ.शिल्पा बांगर यांनी तंबाखूमुक्तीसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेच्या शंभर मीटर त्रिजेच्या आवारात तंबाखूमुक्त शालेय परिसर असे यलो लाईन कॅम्पेन शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून राबविण्यात येत असल्याचे बांगर यांनी सांगितले. शाळांमध्ये तंबाखूमुक्ती जनजागृतीसाठी ऑनलाईन पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोटपा कायदा २००३ मधील विविध कलामांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय पथके स्थापन करण्याची प्रक्रीया सुरू झाली असल्याचेही बांगर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्यदायी जीवन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तंबाखूमुक्त आरोग्यदायी जीवन या पुस्तिकेचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नडे यांनी तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी शासकीय यंत्रणा व कार्यालय यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
===Photopath===
160221\16nsk_59_16022021_13.jpg
===Caption===
आरोग्यदायी जीवन पुस्तिकेचे प्रकाशन करतांना दत्तप्रसाद नडे, समवेत डॉ. श्रीनिवास,गणेश परळीकर, संदीप देवरे, सचिन सावंत, डॉ.शिल्पा बांगर, उज्वला पाटील, आर. डी. बच्छाव,आदि.