पिवळी पिके हे दाहक वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:08 AM2018-09-07T00:08:02+5:302018-09-07T00:10:24+5:30
नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.
नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संजय पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषद सदस्य आशाबाई जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिरडकर, श्रावण गोºहे आदी व्यासपीठावर होते.
आढावा बैठकीच्या निमित्ताने समस्याग्रस्त लोकांच्या समस्यांना वाचा फुटली. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलांच्या रकमा, ४२ खेडी व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी अशा अनेक समस्यांचा पाढा जनतेने खासदारांसमोर वाचला. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेता खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला होणाºया बैठकीत नांदगाव तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वाढणार असल्याचे सांगितले.
सामान्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन राहून बैठकांना अनुपस्थित राहणाºया अधिकाºयांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याची सूचना चव्हाण यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली. अधिकारी काम करीत नसल्याने निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी मांडून खासदारांनी त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीचे पैसे भरल्यावरदेखील जिल्हा परिषदेकडून पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते, ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत वीज वितरण विभागाच्या तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. टँकर भरून द्याकेवळ ३८ टक्के पाऊस होऊनही ४० टक्के पिके चांगली आहेत. या कृषी अधिकाºयांच्या माहितीला नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. तुरळक पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो. त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली.