येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:51 AM2019-05-10T00:51:58+5:302019-05-10T00:53:40+5:30

नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अ‍ॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Yellya police officers in the trap of bribery | येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देभ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अ‍ॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाइकाच्या वाहनाचा अपघात होऊन त्यात नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. सदर गुन्ह्यातील अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी आणि अ‍ॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे देण्याकरिता पोलीस शिपाई गणेश नागरे याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, तडजोडीअंती नागरे याने ८ हजार रुपयांची मागणी करीत सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Yellya police officers in the trap of bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.