येवला बाजार समिती देणार शेतमाल तारण कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:39 PM2018-10-03T17:39:34+5:302018-10-03T17:39:43+5:30

दिलासादायक : कृषि पणन मंडळामार्फत योजना

Yeola Bazar Samiti Committed Taram Loan | येवला बाजार समिती देणार शेतमाल तारण कर्ज

येवला बाजार समिती देणार शेतमाल तारण कर्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे७५ टक्के पर्यंतचे कर्ज वार्षिक ६ टक्के व्याज दराने बाजार समिती स्वनिधीतून किंवा कृषि पणन मंडळातर्फेउपलब्ध करु न दिले जाणार आहे.

येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीने सन २०१८-१९ या वर्षाकरीता पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
येवला तालुक्यातील शेतक-यांसाठी तुर, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफुल, चना, भात (धान), करडई, वाघ्या घेवडा, ज्वारी, बाजरी, गहु, मका या शेतीमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंतचे कर्ज वार्षिक ६ टक्के व्याज दराने बाजार समिती स्वनिधीतून किंवा कृषि पणन मंडळातर्फेउपलब्ध करु न दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व्यवस्थित चाळणी करु न व आर्द्रता नियंत्रित करु न ५० किलो वजनाच्या पॅॅकिंग मध्ये आणावा. सदर माल बाजार समितीच्या गुदामात किंवा वखार महामंडळाच्या गुदामात ठेवल्यानंतर गुदाम पावती करु न दिली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर शेतकºयांना शेतमालावर तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शेतमालाच्या प्रतवारीनुसार एकुण किंमतीच्या ७५ टक्के कर्ज बाजार समिती त्वरीत उपलब्ध करु न दिले जाणार आहे. सहा महिने मुदतीच्या कर्जासाठी ६ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.
शेतमालाच्या बाजारभावाच्या तेजी मंदीनुसार शेतक-यांना या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेता येणार असून योग्य भाव मिळेपर्यंत शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या किंवा वखार महामंडळाच्या गुदामात सुरक्षित ठेवू शकतील. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतक-यांना योग्य भाव मिळेपर्यंत मालाची साठवणूक करता येणार असून योग्य भावात आपला शेतमाल विकता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीच्या सभापती सौ. उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर, प्रभारी सचिव के. आर. व्यापारे व संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Yeola Bazar Samiti Committed Taram Loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.