येवला बस आगाराचे तीन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 09:49 PM2020-05-19T21:49:30+5:302020-05-20T00:02:05+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे.

Yeola bus depot loses Rs 3 crore | येवला बस आगाराचे तीन कोटींचे नुकसान

येवला बस आगाराचे तीन कोटींचे नुकसान

Next
ठळक मुद्देउत्पन्न घटले : कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे.
येवला आगारातून दररोज पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, कळवण, मालेगाव, मनमाड, अहमदनगर या शहरांकडे बसेस धावतात. दिवसभरात ४६ बसेसच्या १५ हजार किलोमीटरच्या ३४९ फेºया होतात, तर दररोज ४ हजार ५०० प्रवाशांना या एसटी बसेस इच्छितस्थळी पोहोचवतात.
आगारात ९६ चालक असून, ८१ वाहक आहेत, तर २३ चालक कम वाहक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने ४६ बसेस आगारात उभ्या आहेत तर सुमारे २५० कर्मचारी घरी बसून आहेत. आगाराचे दररोज सरासरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. उन्हाळ्याच्या
सुटीत दररोज सहा लाखांहून अधिक उत्पन्न आगाराला मिळते तेदेखील
या हंगामात बुडाले आहे. उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला बसला आहे. अनेक वाहक-चालक काम नसल्यामुळे घरी बसून असून, आगाराला उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
मजुरांसाठी १३ बसेस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी येवला आगाराकडून १३ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या १३ बससेच्या माध्यमातून झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेवर सेंधवा येथे सोडण्यात आले, तर काही प्रवाशांना नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोडण्यात आले.

Web Title: Yeola bus depot loses Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.