मका खरेदीत येवला केंद्र अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:00 PM2020-07-18T21:00:23+5:302020-07-19T00:56:12+5:30

येवला : मकाचे बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व येवला केंद्रावर झालेली मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे येवला केंद्राची खरेदी अव्वल राहिली आहे.

Yeola Center tops in maize procurement | मका खरेदीत येवला केंद्र अव्वल

मका खरेदीत येवला केंद्र अव्वल

Next

येवला : मकाचे बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व येवला केंद्रावर झालेली मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे येवला केंद्राची खरेदी अव्वल राहिली आहे.
नाशिक जिल्हाभर आठ खरेदी केंद्रांवर ७५८४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन मका नोंदणी केली होत. पैकी ३०५६ शेतकºयांचा मका खरेदी व्यवहार होऊन अर्धाच्यावर ४५२८ शेतकरी नोंदणी होउनही खरेदीविना वंचित राहिलेले असतांना येवला तालूका सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या माध्यमातुन शासकिय मका खरेदीसाठी एकून ८५८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. पैकी १८४ शेतकºयांना मका विक्र ीसाठी आणावी असा संदेश संघाने देउनही सदर शेतकºयांनी मका शासकिय खरेदी केंद्रावर विक्र ी करण्यासाठी आणला नाही. नोंदणीधारक एकून ५२५ शेतकºयांची १५ हजार ९५१ क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दत्ता आहेर, व्हाईस चेअरमन संतोष लभडे यांनी दिली आहे.रब्बी हंगामाची मका या वर्षी प्रथमच खरेदी करण्यात आली. २७ मे ते १५ जुलै २०२० या कालावधीत ही खरेदी पार पाडली. केंद्रशासनाची मका खरेदीची अंतिम मुदत ३० जुन व उदिष्टय २.५ लाख टन पूर्ण झाल्यावर प्केंद्रिय अन्नपुरवठा मंत्रालयाने १५ जूलैपर्यंत खरेदीला मुदतवाढ देउन ९ लाख टनचे उद्दिष्ट दिले. त्यात येवला तालूका मका उत्पादकांना न्याय मिळाला आहे. मका बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व झालेली येवला केंद्रावर मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालूक्यातील शेतकºयांना झाला आहे.
---------------------
जिल्हाभरात नोंदणीधारक ६० टक्के शेतकरी मका खरेदी पासुन वंचित राहिले असले तरी येवला केंद्रावर सर्व अडचणीतून मार्ग काढत फक्त् १७.४ टक्के नोंदणीकृत शेतकरी मका खरेदीपासुन वंचित राहिले. जिल्हयात येवला केंद्राची खरेदी अव्वलस्थानी राहिली आहे.
- बाबा जाधव, व्यवस्थापक,
खरेदी विक्र ी संघ
-------------------------------
तालूक्यात या वषी ३ हजार हेक्टर खरीप बाजरीचा पिकपेरा आहे व दरवर्षी बाजरी कवडीमोल भावाने विकली जाते. या वर्षी शासकिय बाजरी व ज्वारी खरेदी केंद्राला येवला येथे परवानगी मिळवुन आणण्याकामी संघ पदाधिकाºयांना सोबत घेउन प्रयत्न करणार आहे.
- भागुनाथ उशीर, संचालक, खरेदी विक्र ी सहकारी संघ येवला

Web Title: Yeola Center tops in maize procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक