येवला नगर परिषद अभूतपूर्व गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:01 AM2017-09-01T00:01:31+5:302017-09-01T00:02:56+5:30

पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही आणि सध्याचे मुख्याधिकारी कामकाजासाठी वेळ देत नाहीत. ठरलेला वार असलेल्या दिवशी नगरपालिकेत हजर राहत नाहीत. सांगितलेली कामे होत नाहीत, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांच्या गटाने केली. परंतु समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अपक्षांच्या गटाने अभूतपूर्व गोंधळ घालत सभा तहकूब केली.

Yeola city council unprecedented mess | येवला नगर परिषद अभूतपूर्व गोंधळ

येवला नगर परिषद अभूतपूर्व गोंधळ

googlenewsNext

येवला : पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही आणि सध्याचे मुख्याधिकारी कामकाजासाठी वेळ देत नाहीत. ठरलेला वार असलेल्या दिवशी नगरपालिकेत हजर राहत नाहीत. सांगितलेली कामे होत नाहीत, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांच्या गटाने केली. परंतु समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अपक्षांच्या गटाने अभूतपूर्व गोंधळ घालत सभा तहकूब केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवक शीतल शिंदे आणि सचिन शिंदे यांनी जनतेची कामे नगरपालिकेत सांगूनही कोणतीही हालचाल होत नसल्याचा निषेध म्हणून सर्वसाधारण सभेत अध्यक्षांच्या समोरच सभागृहात ठिय्या मांडत जाब विचारला आणि सभेवर बहिष्कार टाकीत भर सभेतून बाहेर जात प्रवेशद्वारावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यामुळे गणसंख्या पर्याप्त नसल्याने सभेचे कामकाज नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी तहकूब केले व पुन्हा सभा दुपारी बोलविली. मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी नियमाचा आधार घेत, तहकूब सभेला कोरमची आवश्यकता नसल्याने राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेच्या तीन नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सभेचे कामकाजास सुरुवात केली. नगर परिषदेची सभा गुरुवारी बोलाविण्यात आली होती. सभेला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपाध्यक्ष सूरज पटणी यांच्यासह एकूण २६ सदस्य हजर होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. संकेत शिंदे व अजय भागचंद जैन हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गैरहजर होते. वंदे मातरम झाल्यानंतर रेल्वे अपघात, सीमेवर शहीद झालेले जवान, बाभुळगाव शिवारात झालेला अपघात, शहरातील ज्ञात-अज्ञात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सभेला गोंधळातच सुरु वात झाली नगरसेवक प्रा.शीतल प्रशांत शिंदे यांनी नगराध्यक्षांसमोर जमिनीवर बसून ठाण मांडले. प्रभागातील कामे का केली जात नाही असा जाब विचारला आणि जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत सभागृहात खुर्चीवर बसणार नाही, असे अध्यक्षांना सुनावले. शीतल शिंदे यांच्या साथीला राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे, प्रवीण बनकर, शेख परवीनबानो, शेख तेहसीन, मोमीन सबिया, शेख रईसाबानो मुश्ताक हेदेखील येत नगराध्यक्षांसमोर येऊन जमिनीवरच ठाण मांडून बसले व विकासकामे त्वरित सुरू करावीत, अशी जोरदार मागणी केली. कोणतीही कामे सांगितले तर नगरपालिकेचे कर्मचारी निधी नाही असे उत्तर देत कामे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना सांगा असे सांगतात, असा आरोप करीत प्रा.शीतल शिंदे यांनी नऊ महिने झाले तरी कवडीचेही काम नगरपालिका करीत नाही तर मग आमच्या कॉलनी भागातून गोळा होणारा मोठा महसूल जातो कुठे, असा सवाल केला. दरम्यान मुस्लीम भागात कामे होत नसल्याबददल शेख अमजद,सफीक शेख, व सर्व मुस्लीम नगरसेवकांनी नगराध्यक्षांना विचारणा केली. देविचा खुंट ते नागड दरवाजा व न्यायालयाकडे जाणार्या रस्त्यावर एलईडी बल्ब असलेली स्ट्रिटलाईट लावण्याची मागणी करीत विकासकामाच्या बाबतीत भेदभाव केला जात असल्याचा आरोप मुस्लिम नगरसेवकांनी केला. यावर नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर यांनी सर्व नगरसेवकांची कामे मार्गी लावली जातील व सभेचे कामकाज सुरु करावे. आपल्या आसनावर बसावे अशी विनंती केली. परंतु समाधान न झाल्याने शेख अमजद,शफीक शेख.शेख निसार अहमद, शेख परवीनबानो, शेख तेहसिन, मोमीन सबिया,शेख रईसाबानो मुश्ताक यांनी सभात्याग केला. अपक्षाचे गटनेते नगरसेवक रु पेश लोणारी यांनी मुख्याधिकारी हे दर बुधवार व गुरु वार येणार असे कबुल करु न देखील बुधवार 30 आॅगस्ट रोजी न आल्याने त्यांनी स्पष्टीकरण दयावे व माफी मागावी बाबत मागणी केली परंतु मुख्याधिकारी यांनी स्पष्टीकरण देतांना या आठवडयातील सोमवार रोजी येवला नगरपरिषदेचे भुयारी गटार संदर्भात मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे हजर राहुन काम पाहिले व मंगळवार व बुधवारी सकाळचे सत्रात मनमाड नगरपरिषदेमध्ये कामकाज केले व दुपारचे सत्रात धार्मिक कामानिमित्त सुटटी घ्यावी लागली असे सभागृहास सांगितले तथापि मुख्याधिकारी यांनी या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे न देता नगरसेवकांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करीत अपक्ष नगरसेवक रु पेश लोणारी यांचेसह अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे,सचिन मोरे, शिफक शेख, अमजद शेख यांचेसह शिवसेनेच्या दयानंद जावळे आण ि यांनी सभात्याग केला.

Web Title: Yeola city council unprecedented mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.