येवला : सेनापती तात्या टोपे राष्टÑीय स्मारक समितीचे निवेदन नवीन जागेस बदलास हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:36 AM2018-04-08T00:36:22+5:302018-04-08T00:36:22+5:30
येवला : भूमिपुत्र तात्या टोपे यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
येवला : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित स्मारक उचित जागी व्हावे या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व या मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला जागा बदलाच्या सूचना केल्या. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रव्यवहार करून हिरवा झेंडा दाखवला. येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावा-जवळील जागेवर हे स्मारक व्हावे, असा ठराव पालिकेने केला आहे. परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा गैरसोयीची व अडगळीची असल्याने हे स्मारक नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील अंगणगाव शिवारातील शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागी
व्हावे, अशी मागणी तात्या टोपे राष्टÑीय स्मारक समितीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर समितीने सुचवलेल्या जागीच नियोजित स्मारक व्हावे यासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांनी तयारी दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेने दर्शविली व यासंबंधीचा प्रस्ताव कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडे अहवाल व नकाशा तत्काळ पाठवला, अशी माहिती यावेळी नितीन गडकरी यांना
खासदार चव्हाण व समिती सदस्यांनी दिली. यावेळी गडकरी यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे, समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी, माजी नगरसेवक पैलवान संजय कुक्कर, धीरज परदेशी, बडाअण्णा शिंदे, संजय सोमासे, मयूर मेघराज, श्रीकांत खंदारे, खासदार चव्हाण यांचे स्विय्य सहाय्यक डॉ. संदीप पवार उपस्थित होते.