येवल्यात डॉ. कुप्पास्वामी पहिल्या लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 08:55 PM2021-01-16T20:55:38+5:302021-01-17T00:46:45+5:30
येवला : कोविड विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिली लस ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी घेतली.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. आनंद तारू, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. अक्षय सालपुरे, डॉ. पंकज पाटील, डॉ. मुक्तानंद लुकटे, डॉ. हितेंद्र डोंगरे, डॉ. साहेबराव मदनुरे, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, डॉ. प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
तालुक्यात प्रारंभी शासकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने सदर लस दिली जात आहे. ग्रामीण रुग्णालयास ३५० लस उपलब्ध झालेली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले.