येवल्यात एक वस्त्र, एक करंजी मोलाची उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:04 AM2021-11-10T00:04:19+5:302021-11-10T00:04:53+5:30

येवला : दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील गरीब व दीनदुबळ्या वर्गातील बांधवांनाही सामावून घेण्याच्या उद्देशाने एक वस्त्र मोलाचे व एक ...

In Yeola, a garment, a fountain of value | येवल्यात एक वस्त्र, एक करंजी मोलाची उपक्रम

येवला तालुक्यातील नागडे येथील आदिवासी वस्तीवर वस्त्र व फराळ वाटप करताना खटपट युवा मंचचे पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी, कष्टकरी कुटुंबाची दिवाळी केली खटपट युवा मंचने गोड

येवला : दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील गरीब व दीनदुबळ्या वर्गातील बांधवांनाही सामावून घेण्याच्या उद्देशाने एक वस्त्र मोलाचे व एक करंजी मोलाची हे दोन उपक्रम खटपट युवा मंचतर्फे तालुक्यातील नागडे येथील आदिवासी वस्तीत राबविण्यात आले. यामुळे आदिवासी कष्टकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे.
नेहरू युवा केंद्र व खटपट युवा मंचच्या वतीने मुकेश लचके यांनी येवले शहरातील नागरिक, दुकानदार तसेच दानशूर व्यक्तींकडून तीन दिवस फिरून वस्त्र व फराळाचे संकलन केले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे कपडे, महिलांसाठी साड्या, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, भावाची भेट म्हणून वस्त्र तसेच फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळाले.

सदर उपक्रमासाठी खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी संकलित केलेला फराळ व वस्त्रांची वर्गवारी करून तालुक्यातील नागडे परिसरातील प्राथमिक शाळेच्या समोरील आदिवासी वस्त्यांवरील बांधवांना व दीनदुबळ्यांना वाटप करण्यात आले. यामुळे आदिवासी कष्टकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी झाली.
या उपक्रमात खटपट युवा मंचचे अध्यक्ष संयोजक मुकेश लचके, संत शिरोमणी नामदेव महाराज युवा सेवा समितीचे उपाध्यक्ष राम तुपसाखरे, चिटणीस पुरुषोत्तम रहाणे, संघटक अमोल लचके, श्री संत नामदेव शिंपी समाजाचे कार्यकारिणी सदस्य बळीराम शिंदे तसेच सेवा समितीचे कार्यकर्ते गोकुळ गांगुर्डे, वरद लचके, फेटा कलाकार श्रीकांत खंदारे आदी सहभागी झाले होते.

 

Web Title: In Yeola, a garment, a fountain of value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.