येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:31 PM2018-09-27T22:31:23+5:302018-09-27T22:32:01+5:30

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

From Yeola to Kalmathan | येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी

येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी

googlenewsNext
ठळक मुद्देजंगलीदास महाराजांचा प्रगट दिन : १११ प्रकारच्या मिठार्इंचे वाटप

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
येवल्यातील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमी येथील भूमीवर सन १९६७ मध्ये जंगलीदास महाराज यांनी कठोर तपश्चर्या करून ११ महिन्यांचे निराहर तप केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला म्हणून आत्मा मालिक परिवारातील भाविक व भक्तगण हा दिवस आत्मसाक्षात्कारी दिवस म्हणून साजरा करतात. यानिमित्ताने येवला ते कोकमठाण पायी दिंडी काढण्यात आली. घराघरांतून १११ बांबूच्या पाट्या सजवून १११ प्रकारची मिठाई सद्गुरुचरणी कोकमठाण येथे अर्पण करण्यात आली. दिंडीचा सोहळा अत्यंत भव्य असा होता. भजन, कीर्तनाचा कार्यक्रमया सोहळ्यात ११०० महिला व पुरु ष तसेच भजनी मंडळ सहभागी झाले होते. दिंडी कोकमठाण येथील आश्रमात पोहोचली. त्या ठिकाणी सर्व विश्वस्त व संत यांनी दिंडीचे स्वागत करून भक्तांनी आणलेला १११ प्रकारचा प्रसाद सद्गुरुंसमोर अर्पण केला. या दिंडी सोहळ्याचे नियोजन येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्यासह संत कंकाली बाबा व सेवादास महाराज यांनी केले होते. दोनही गुरुकुलाचे प्राचार्य व शिक्षक या दिंडीत सहभागी झाले होते. आत्मवंदनेचा व भजन कीर्तनाचा कार्यक्र म होऊन सांगता झाली.

Web Title: From Yeola to Kalmathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.