येवला, मुंजवाड : परिसरातील आदिवासींना फराळ वाटप एकलव्य जयंतीनिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:00 PM2018-02-13T23:00:16+5:302018-02-13T23:53:40+5:30
मुंजवाड : येथील इंदिरानगर वसाहतीत महादंडनायक वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच प्रमिला पवार यांच्या हस्ते एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मुंजवाड : येथील इंदिरानगर वसाहतीत महादंडनायक वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच प्रमिला पवार यांच्या हस्ते एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई खैरनार, राहुल जाधव, एकनाथ गांगुर्डे, भगवान जाधव, नारायण जाधव, ग्रामविकास अधिकारी एस. बी. देवरे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती पवार म्हणाल्या की, भगवान एकलव्यांनी गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. तो पाहून त्यांनी धर्नुविद्येचे ज्ञान ग्रहण केले. त्यांचे अनुकरण करून आजच्या पिढीने शिक्षणात निपुण होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी साहेबराव पवार, भिका जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी ३ वाजेपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी रमेश निकम, भाऊसाहेब सोनवणे, सुनील सोनवणे, सचिन गांगुर्डे, विश्वास माळी, संदीप वाघ, भागचंद सोनवणे, वत्सलाबाई माळी, दिनकर गांगुर्डे, बाळू गांगुर्डे, लालजी पवार, गणेश सोनवणे, पंढरीनाथ गांगुर्डे, सुनील ठाकरे, नथू माळी, पोपट बोरसे, दौलत माळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्राह्मणगाव येथे शिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मुखवट्याची व शिवलीलामृत ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. कानिफनाथ महाराज व म्हसोबा महाराज मित्रमंडळाच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एकलव्य प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .