जमावबंदीचे उल्लंघन केल्यास येवला पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:13 PM2020-03-24T17:13:11+5:302020-03-24T17:13:47+5:30
मानोरी : जमावबंदी काळात तालुक्यातील नागरिकांनी घरात बसण्याच्या सूचना असताना जर कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा येवला पोलिसांनी दिला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू असतानाही ग्रामीण भागातील जनता या आदेशाला डावलून सर्रासपणे रस्त्याने फिरताना दिसत आहे. येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गस्त घालवण्यात येत आहे. संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलीस यंत्रणेने दिला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , खडकीमाळ, मुखेड , सत्यगाव , देशमाने , मुखेड फाटा , जळगाव नेऊर आदी भागात पोलिसांनी दिवसभर गस्त घातली. कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने देखील बंद ठेवण्याच्या सूचना यादरम्यान पोलीस कर्मचारी हेमंत लकडे यांनी ग्रामस्थांना दिल्या.