येवला तालुक्याच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे-भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:00+5:302021-02-08T04:14:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क येवला : शिवसृष्टी प्रकल्प व मुक्तीभूमी येथील कामासाठी तातडीने निविदाप्रक्रिया राबविण्यात यावी. येवला शहरासह तालुक्याच्या ...

Yeola should plan for sustainable development of the taluka - Bhujbal | येवला तालुक्याच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे-भुजबळ

येवला तालुक्याच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे-भुजबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

येवला : शिवसृष्टी प्रकल्प व मुक्तीभूमी येथील कामासाठी तातडीने निविदाप्रक्रिया राबविण्यात यावी. येवला शहरासह तालुक्याच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

येवला तालुक्यातील विविध विकासकामांबाबत संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी भुजबळ म्हणाले, महावितरणबाबत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना जास्त वेळ वीज उपलब्ध करून द्यावी. कुसुर आणि अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्राचे काम तात्काळ पूर्ण करावे. तसेच पुढील आठ ते दहा दिवसांत येवला उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करण्यासाठी तयारी करण्याबात सूचना आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देवून येवला नगरपालिकेच्या प्रलंबित कामांचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत. येवला प्रशासकीय संकुलातील देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सर्व कार्यालयांनी घ्यावी. याठिकाणी कँटीनसह, गार्डन विकसित करण्यात यावे तसेच कोपरगाव मनमाड रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. शहरात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच येवला येथील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी येवला व निफाड परिसरातील कायदा व सुव्यस्थेचाही आढावा घेतला.

बैठकीस अधीक्षक अभियंता शरद राजभोज, येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उमेश पाटील, महावितरणचे कार्यकरी अभियंता संजय तडवी, दिनेश गवळी, येवला अर्बनचे महेश जगताप, उपविभागीय अभियंता सागर चौधरी, उपअभियंता स. प्र. राजपूत, तालुका कृषी अधिकारी के. ए. नवले, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Yeola should plan for sustainable development of the taluka - Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.