येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:30 PM2019-07-13T18:30:20+5:302019-07-13T18:31:33+5:30

येवला व अंदरसूल बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती.

 Yeola, in the Sunshine markets, keep the onion ink | येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून

येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून

Next

येवला : येथील व अंदरसूल बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात कांद्याची एकूण आवक २२,७८९ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु . ४०० ते १३८६, तर सरासरी १२२५ प्रतिक्विंटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथेही कांद्याची एकूण आवक १०७३० क्विंटल झाली. बाजारभाव किमान ३०० ते १३५६, तर सरासरी १२२५ प्रतिक्विंटलपर्यंत होते.
सप्ताहात गव्हाची एकूण आवक दहा क्विंटल झाली. बाजारभाव किमान १९०१ ते कमाल २२५१, तर सरासरी १९०१ रु. प्रतिक्विंटलपर्यंत होते. बाजरीची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ४४ क्विंटल झाली. बाजारभाव किमान १६०० ते कमाल २३५१, तर सरासरी २१५० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १२ क्विंटल झाली. बाजारभाव किमान ३००० ते कमाल ३९५२ रुपये, तर सरासरी ३६३७ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाल्याने बाजारभावात तेजीत होते. मकास व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली.

Web Title:  Yeola, in the Sunshine markets, keep the onion ink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.