येवला तालुका : औरंगाबाद येथील शिक्षकावर लाठीचार्ज

By Admin | Published: October 8, 2016 11:57 PM2016-10-08T23:57:52+5:302016-10-08T23:58:19+5:30

विविध शिक्षक संघटनांकडून निषेध

Yeola Taluka: Lathi Charge for a teacher in Aurangabad | येवला तालुका : औरंगाबाद येथील शिक्षकावर लाठीचार्ज

येवला तालुका : औरंगाबाद येथील शिक्षकावर लाठीचार्ज

googlenewsNext

येवला : गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर बेठबिगारीसारखे काम करणाऱ्या शिक्षकांनी औरंगाबाद येथे काढलेल्या मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणात शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा येवल्यात विविध शिक्षक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार नरेश बहिरम यांना शासनाच्या या कृतीचा निषेध करणारे निवेदन शिक्षक संघटनांनी दिले.
शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. प्रांताधिकारी वांसती माळी, तहसीलदार नरेश बहिरम, यांना निवेदन दिले. निवेदनावर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तकुमार उटावळे, कार्यवाहक प्रदीप पाटील, राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदाणे, किशोर जगताप, डी. एम. नागडेकर, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शिवाजी भालेराव, उपाध्यक्ष चंपा रणदिवे, वसंत धात्रक, सुनील मेहत्रे, कनिष्ठ महविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष एम. पी. गायकवाड, संतोष विंचू, काष्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब पटाइत, अध्यापक संघटनेचे अर्जुन कोकाटे, शिक्षकेतर संघटनेचे सचिन मुंढे, धर्मराज शिरसाठ, बाळासाहेब मोरे, बी. आर. नारायणे, के. व्ही. पैठणकर, बी. ए. अनर्थे, ए. डी. जाधव, जे. सी. वळवी, एम. पी. ढोले, बी. के. जाधव यांच्यासह विविध विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Yeola Taluka: Lathi Charge for a teacher in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.