‘‘होय, मी सावरकर बोलतोय!’’ नाटक रविवारी रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:55+5:302021-01-08T04:41:55+5:30
नाशिक : लॉकडाऊनच्या काळानंतर प्रेक्षकांनी नाटकाकडे पुन्हा वळावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, या दुहेरी हेतूने ‘‘होय, ...
नाशिक : लॉकडाऊनच्या काळानंतर प्रेक्षकांनी नाटकाकडे पुन्हा वळावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, या दुहेरी हेतूने ‘‘होय, मी सावरकर बोलतोय!’’ या नाटकाचे सादरीकरण रविवारी (दि. १०) करण्यात येणार आहे.
आकाश भडसावळे यांच्या मुंबईतील ‘‘अभिजात प्रॉडक्शन्स’’ या संस्थेने नाटक सर्वांसाठी खुले ठेवले आहे. या नाटकासाठी स्वेच्छा मूल्य देण्याचा पर्याय नागरिकांना देण्यात आला आहे.
फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या सहकार्याने येत्या १० जानेवारीला नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे या नाटकाचा प्रयोग सायंकाळी ६ वाजता होणार आहे. नाटकात नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, मादाम कामा, पृथ्वीराज कपूर यांच्यादेखील भूमिका साकारल्या जाणार आहेत. त्यात बहार भिडे, सचिन घोडेस्वार, नरेंद्र कुलकर्णी, कविता नाईक, सुमीत चौधरी, प्रसाद संगीत आणि आकाश भडसावळे हे कलाकार काम करीत आहेत.