उद्यापासून शहरात नवरात्रीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:55 PM2017-09-19T23:55:46+5:302017-09-19T23:56:42+5:30
नवरात्रोत्सव : बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाचेही आयोजन नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुरुवार (दि. २१) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी, भद्रकाली देवी मंदिर, तसेच सांडव्यावरची देवी आदि मंदिरांसह शहरातील विविध देवी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडूनही दांडिया आणि गरब्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नवरात्रोत्सव : बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाचेही आयोजन
नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुरुवार (दि. २१) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी, भद्रकाली देवी मंदिर, तसेच सांडव्यावरची देवी आदि मंदिरांसह शहरातील विविध देवी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडूनही दांडिया आणि गरब्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
पितृपक्षानंतर सुरू होणाºया नवरात्रोत्सवाला मंदी असलेल्या बाजारपेठेत उत्साह संचारणार
आहे.
या उत्सवकाळात नाशिकची ग्राम देवता म्हणून ओळखल्या जाणाºया कालिका देवी यात्रेसाठीची तयारीदेखील पूर्ण झाली असल्याची माहिती कालिका देवी मंदिर ट्रस्टने दिली असून, या भागात रहाट-पाळण्यांसह विविध प्रकारच्या खेळणी व पूजा साहित्यांची दुकाने लावण्यात येणार आहे. यावर्षी शुक्रवारी (दि. २९) नवरात्रोत्सवाची सांगता होणार असून, शनिवारी (दि. ३०) दसºयाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सव काळात गंगापूर धबधब्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिर येथे गुरुवार (दि. १९) सप्टेंबर ते दि. ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘ब्रह्मोत्सवा’चे देखील आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार (दि. २१) आश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे साडेपाच वाजता महापूजेने ब्रह्मोत्सवास सुरुवात होणार आहे. ब्रह्मोत्सवाअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) महापूजा, सामूहिक तुलसी अर्चना, ध्वजपूजन, शनिवारी (दि. २३) कुंकूम अर्चना, रविवारी (दि. २४) हिरण्य अर्चना, कुमारिका पूजन, महालक्ष्मी मंदिर महावस्त्र अर्पण सोहळा, सोमवारी (दि. २५) पुष्पार्चना यांसह दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेला गुरुवारी (दि. ५) ब्रह्मोत्सवाची सांगता होणार असून, या ब्रह्ममहोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.