येवलेकरांचा घसा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:14 AM2019-03-06T01:14:57+5:302019-03-06T01:15:19+5:30

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.

Yevalekar's throat is dry | येवलेकरांचा घसा कोरडाच

येवलेकरांचा घसा कोरडाच

googlenewsNext
ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : चार दिवसांआड १५ मिनिटे अशुद्ध पाणीपुरवठा

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.
सोमवारी तर मध्यवस्तीसह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आवर्तन मिळण्यासाठी कागदोपत्री श्रेयवादाचेही प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ मार्चला आवर्तन सोडणार असल्याचे लेखी आश्वासनदेखील मिळाले. अद्यापपावेतो पाणी आलेच नाही. आता १० मार्चच्या पुढे पाणी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता ५० दलघफुटाची आहे. परंतु वारेमाप अनधिकृत पाणी उपसा आणि अयोग्य वितरण व्यवस्था यामुळे चार योजना राबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच राहत असल्याचा टाहो अनेकदा फोडला जातो. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला पत्राद्वारे कळविले. पण पाणी आवर्तन सुटलेच नाही. आणखी किमान १५ ते २० दिवसांनी आवर्तन सुटणार असल्याची चर्चा आहे. आणखी काही दिवस येवलेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती दिसत आहे. पालिकेच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याचेही कोणाला सोयरसुतक नाही. पाणीटंचाई सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.२०० विहिरीतून पाण्याचा उपसापालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफूट पाणी मार्चअखेर पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायलाच हवे. पण पाच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी संपुष्टात येते. हे नेमके गणित कायम बिघडले आणि ते कुठे बिघडते. हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी पाच दिवसाआड पाणी मिळते. खासगी पाण्याचे टँकर राजकीय वरदहस्ताने साठवण तलावालगतच्या विहिरीवरून सर्रासपणे भरले जात असल्याची चर्चा आहे. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा, पालिकेचे पाणीवाटपाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात पाणीटंचाई आहे.

Web Title: Yevalekar's throat is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.