येवला, देवळा, मालेगाव, चांदवड, दिंडोरी : कोरेगावप्रकरणी भिडे, एकबोेटे यांच्या अटकेची मागणी भारिप बहुजन महासंघातर्फेधरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:59 PM2018-03-03T23:59:58+5:302018-03-03T23:59:58+5:30
नाशिक : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी भारिपतर्फे जिल्ह्यात देवळा, दिंडोरी, येवला, मालेगाव आणि चांदवड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिक : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी भारिपतर्फे जिल्ह्यात देवळा, दिंडोरी, येवला, मालेगाव आणि चांदवड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना तातडीने अटक करावी, महाराष्टÑ बंदमध्ये नोंदविलेले गुन्हे रद्द करा, हल्ल्यात झालेली नुकसानभरपाई तातडीने द्या, एस.सी., एस.टी. ओबीसी शिष्यवृत्तीत वाढ करा व थकीत शिष्यवृती तातडीने अदा करा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आले. देवळा : येथे आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केले. यावेळी राहुल गरुड, उमेश सोनवणे, महेंद्र अहिरे, विलास माळी, निशाण बच्छाव, प्रमोद वाघ, बाळासाहेब अहिरे, नितीन भोगे, दादा अहिरे, भावडू सोनवणे, मच्छिंद्र बच्छाव, सुनील आंबेकर, दत्तू सोनवणे, राजेंद्र जाधव, दीपक जमदाडे, रवि जाधव, नितीन वाघ, गुलाब जाधव, दिलीप खरे, रवि सोनवणे उपस्थित होते. दिंडोरी : भारिप बहुजन महासंघातर्फे दिंडोरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव सम्राट पगारे, तालुका अध्यक्ष प्रमोद निकम, भीमराव गांगुर्डे, माजी पं.स. सदस्य गणेश शार्दूल, बाळासाहेब शेजवळ, चेतन गांगुर्डे, बाळासाहेब शार्दूल, संविधान गांगुर्डे, विवेक दिवे आदी सहभागी झाले होते. चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र जमून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून धम्म वंदना भन्ते बी.के. अहिरे गुरुजी यांनी घेऊन नंतर मोर्चाने चांदवड तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तर प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारिप तालुकाध्यक्ष संतोष केदारे, संजय केदारे, भाऊसाहेब केदारे, आत्माराम वानखेडे, मिलिंद वानखेडे, उत्तम वानखेडे, भाऊसाहेब उबाळे, हिरामण अहिरे, सतीश जाधव, मनीषा केदारे, बाळू कसबे, शरद केदारे, डी.के. वानखेडे, नामदेव उबाळे, भाऊराव वानखेडे उपस्थित होते.