येवल्यातील बंधारे कालव्याच्या पाण्याने भरावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:47 PM2018-08-05T23:47:02+5:302018-08-05T23:47:13+5:30
अंदरसुल : येवला तालुक्यातील पूर्वभागात पावसाने एक महिन्यापासून दडी मारली असून खेड्यावर वाड्यावस्त्यावर जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येवला तालुका पंचायत समिती सभापती नम्रता जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून त्यासाठी कालव्याचे पाण्याने सर्व बंधारे भरण्यात यावीत अशी मागणी केली आहे.
अंदरसुल : येवला तालुक्यातील पूर्वभागात पावसाने एक महिन्यापासून दडी मारली असून खेड्यावर वाड्यावस्त्यावर जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येवला तालुका पंचायत समिती सभापती नम्रता जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून त्यासाठी कालव्याचे पाण्याने सर्व बंधारे भरण्यात यावीत अशी मागणी केली आहे.येवला तालुक्यातील पूर्वभागातील चारी क्र ४५ ते ५२ पर्यंत पालखेड डावा कालव्याचे पाण्याने पिण्यासाठी सर्व बंधारे भरण्यात यावीत त्या मुळे भीषण पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल व पिण्याच्या प्रश्न सुटू शकणार आहे. त्यासाठी कालव्याचे पाण्याने सर्व बंधारे भरण्यात यावीत अशी मागणी केली आहे. या संदर्भात सभापती नम्रता जगताप, शिवसेनेचे दीपक जगताप व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे.