सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:04 PM2020-07-24T14:04:00+5:302020-07-24T14:04:49+5:30
चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.
चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.शिवारातील सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. या वर्षी खरीप हंगामाची शंभर टक्के पेरणी जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली.परंतु सोयाबीन बियाणे अनेक शेतकºयांच्या शेतात उगवले नाही. त्यामुळे बºयाच शेतकºयांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला .मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व झालेले पिकांचे नुकसान यंदा भरून काढावे , यासाठी करावी लागत असलेली धडपड पुन्हा समस्या निर्मण करत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यात एकूण सोयाबीन पेरणी १३ हजार हेक्टरवर झाली आहे. ऊस ,टमाटे व इतर भाजीपाला लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे पण मात्र सोयाबीन अधिक असते.परंतु अवघ्या काही दिवसातच पानाला पिवळेपणा लागल्याने संकट आले आहे.