बिटको महाविद्यालयात योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:03+5:302021-06-22T04:11:03+5:30
येथील बिटको महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त किड्स किंग्डम शाळेच्या प्राचार्या प्रीती कुकेकर यांचे योग ध्यानधारणेमुळे शारीरिक-मानसिक व अध्यात्मिक फायदे ...
येथील बिटको महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त किड्स किंग्डम शाळेच्या प्राचार्या प्रीती कुकेकर यांचे योग ध्यानधारणेमुळे शारीरिक-मानसिक व अध्यात्मिक फायदे यावर व्याख्यान आणि योग प्रात्यक्षिक ऑनलाईन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संजय तुपे, प्रा. गणेश दिलवाले, प्रा. डॉ. अर्चना पाटील, गायत्री हर्षे, प्रा. सिद्धार्थ निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रीती कुकेकर यांनी सांगितले की, ध्यानधारणेमुळे तणावमुक्त जीवन जगता येते. आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकतो. शरीर आणि मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते. ध्यानाच्या माध्यमातून आत्मा आणि परमात्मा यांची एकरुपता साधता येते, असे कुकेकर यांनी स्पष्ट केले. एनसीसीतर्फे प्रा. आकाश ठाकूर व प्रा. विजय सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके झाली. कार्यक्रमात ९० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
===Photopath===
210621\21nsk_39_21062021_13.jpg
===Caption===
बिटको महाविद्यालयात योगा