कोकणगाव येथे योग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 06:39 PM2019-06-21T18:39:48+5:302019-06-21T18:40:07+5:30
कोकणंगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक मधुकर पवार, क्रि डा शिक्षक अनिल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना, ताडासन,वृक्षासन,उत्तानासन,अर्धचक्र ासन, त्रिकोणासन,भद्रासन,अर्धउष्ट्रासन, वक्र ासन, मकरासन, शवासन,भुजंगासन, सेतुबंधासन, शलभासन,पवनमुक्तासन आदी योगासने तसेच कपालभारती, भ्रामरी प्राणायाम, सुर्य नमस्कार आदींची प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षकांकडून करवून घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी शरीर व मन निरोगी राहण्यासाठी, मानसिक ताण-तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येकाने दररोज योगासने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक पवार, अनिल सुर्यवंशी, लक्ष्मण पडोळ, शिवाजी जाधव, गीतांजली जाधव आदींनी विद्यार्थ्यासह योगासनांची प्रात्यक्षिके केली.