ओझर महाविद्यालयात योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:10 PM2018-06-21T13:10:45+5:302018-06-21T13:10:45+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर शिक्षण संकूल आणि सात महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ओझर महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.
ओझरटाऊनशिप : ओझर शिक्षण संकूल आणि सात महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ओझर महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्र मात महाविद्यालयातील एन.सी.सी.कँडेटस, एच.ए.एल.हायस्कूल व नविन इंग्रजी शाळा ओझरचे एन.सी.सी.कँडेटस यांनी आज सकाळी सामुदायिकरीत्या योगासनांचे सादरीकरण केले. १ जून ते २१ जून पर्यंत महाविद्यालयात योगासनांचे सराव शिबिर घेण्यात आले.या शिबिरासाठी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिग आँफिसर कर्नल उपेन्द्र कुशवाह,लेफ्ट कर्नल अतिशय शिंदे,ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी पाटील ,एच.ए.एल.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.एन.पाटील, नवीन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापीका ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्राचार्य संभाजी पाटील, डाँ. डी.एस.गोडगे,ज्योती कुलकर्णी, के.एन.पाटील, आँफिसर किशोर कचवे,सचिन हरिश्र्चंन्द्रे,सुभेदार पवनकुमार, हवालदार पांडुरंग डोईफोडे, योगगुरू दिपक सौदागर, मुस्कान अत्तार यांचे सह प्राध्यापकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.