येवला महाविद्यालयात योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:34 PM2021-06-21T22:34:29+5:302021-06-22T00:14:51+5:30
येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्वही सोनी यांनी विशद केले.

योगासनांमुळे शरीर लवचिक व मन एकाग्र बनते असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी बासरीवादनही केले. त्यांना गणेश काबरा यांनी तबला साथ केली. यावेळी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा. शिरीष नांदुर्डीकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. कैलास बच्छाव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. टी. एस. सांगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद जाधव, मोईनुद्दीन शेख यांनी परिश्रम घेतले.