पिंपळगाव कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:47 PM2020-07-20T20:47:04+5:302020-07-21T02:03:26+5:30
पिंपळगाव बसवंत : कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोनाची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते.
पिंपळगाव बसवंत : कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोनाची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते. त्याअनुषंगाने डॉ. सुधीर भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी चेतन काळे, डॉ. रोहन मोरे, डॉ. प्रवीण डोखळे आदींच्या संकल्पनेतून येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येत
आहेत.
कोविड-१९ रोगासाठी कोणतेही रामबाण औषध नसल्याने व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती हीच महत्त्वाची ठरते. शरीरात रोग प्रतिकारशक्ती पांढऱ्या पेशी, टी सेल यांच्या माध्यमातून समजते. शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, पादहस्तासन, अर्धवक्र ासन, धनुरासन, पवनमुक्तासन आदी आसने उपयुक्त आहेत. सूर्यभेदन व नाडीशोधन हे प्राणायामाचे प्रकारदेखील प्रतिकारशक्तीवाढीला मदत करत असल्याचे योग अभ्यासक डॉ.सुधीर भांबर यांनी सांगितले.