देवगावच्या अंगणवाडीत महिलांना योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:12 IST2021-06-21T22:51:48+5:302021-06-22T00:12:16+5:30
देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते.

देवगाव येथील अंगणवाडीमध्ये महिलांना योगाचे धडे देताना योग शिक्षिका प्राजक्ता पाटील.
देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते.
सध्याचे युग धावपळीचे आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारखे अनेक आजार स्थूलपणामुळे जडतात. ताणतणावावर मात करण्यासाठी योगा हे उत्तम शास्त्र आहे. माणसातील ऊर्जा, क्षमता आणि लवचिकता योगामुळे माणूस राखू शकतो. दगदग आणि धावपळीच्या युगात व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आहाराच्या चुकीच्या वेळा यामुळे मानवाला आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांना अतिशय कष्टाची कामे करावी लागतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कामे करावी लागतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे महिलांना वेळ द्यायला जमत नाही. त्यामुळे महिलांना वारंवार एक ना अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. महिलांनी आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सकाळी उठून योगा केल्यास दिवसभरातील कामामुळे थकवा न येता ताजेतवाने वाटेल असे योगाचे महत्त्व योगा शिक्षक प्राजक्ता पाटील यांनी महिलांना पटवून दिले.
यावेळी महिलांमधून सुरेखा दोंदे, जयश्री शिंदे, अर्चना दोंदे, योगीता रोकडे, अंगणवाडी मदतनीस पर्वता वारे आदी महिला उपस्थित होत्या.