सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगा, मेडिटेशन उत्तम पर्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:41+5:302021-07-14T04:17:41+5:30
नाशिक : योगाचे फायदे समजून घेऊन त्याला नित्यनेमाने आचरणात आणणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्यासह सकारात्मक विचारासाठी योगा ...
नाशिक : योगाचे फायदे समजून घेऊन त्याला नित्यनेमाने आचरणात आणणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्यासह सकारात्मक विचारासाठी योगा व मेडिटेशन हाच उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन माजी सीबीआय संचालक डी. आर. कार्तिकेयन यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड अग्रिकल्चर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक जिल्हा व नाशिक महानगर तसेच निपम या संस्थांच्या वतीने ‘कोरोना काळातील योगाचा परिणाम व महत्त्व’ या विषयावर वेबिणार आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला विश्वविख्यात व्याख्याते व माजी सीबीआय संचालक डी. आर. कार्तिकेयन तसेच योगाचार्य विश्वास मंडलिक यांनी योगाविषयीचे मौलिक मार्गदर्शन व कोरोनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करायच्या क्रिया याबद्दलची माहिती दिली.
यावेळी बोलताना कार्तिकेयन यांनी संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झाले असून, कोरोनापासून बचाव करण्यासाठी योगा व मेडिटेशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शरीराची व मनाची क्षमता मजबूत करण्याचे कार्य योगा व मेडिटेशनमुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग व मेडिटेशन करण्याचे आवाहन विश्वविख्यात व्याख्याते व योगगुरु मंडलिक यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. तसेच व्यापारी उद्योजक हे आपल्या कामात व्यस्त असले तरी आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, हे नमूद केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधीर काटकर, डॉ. विजय लाड, विश्वेश कुलकर्णी, सुधीर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. वेबिनारमध्ये योग अभ्यास विषयात योग ज्ञान सन्मान प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. सीमा डेरले, नम्रता देशमुख, डॉ. अरुण खोडसकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन आणि सूत्रसंचालन ॲड. श्रीधर व्यवहारे, तर आभार उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर यांनी मानले.