योग, ध्यान साधनेमुळे मिळते भयमुक्ती :  स्वामी स्मरणानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:56 AM2019-01-29T00:56:30+5:302019-01-29T00:56:46+5:30

योग आणि ध्यानसाधनेमुळे व्यक्ती सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होते. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टींमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रसंग येतातच. परंतु योग आणि ध्यानसाधन्याच्या जोरावर त्यावर मात करून एकाग्रता व मन:शांती प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी स्मरणानंद यांनी केले.

 Yoga, meditation can be achieved by fear of fear: Swami Smarananand | योग, ध्यान साधनेमुळे मिळते भयमुक्ती :  स्वामी स्मरणानंद

योग, ध्यान साधनेमुळे मिळते भयमुक्ती :  स्वामी स्मरणानंद

Next

नाशिक : योग आणि ध्यानसाधनेमुळे व्यक्ती सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होते. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टींमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रसंग येतातच. परंतु योग आणि ध्यानसाधन्याच्या जोरावर त्यावर मात करून एकाग्रता व मन:शांती प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी स्मरणानंद यांनी केले.
भारत सरकारचे सांस्कृ तिक मंत्रालयाच्या माध्यमातून नाशिक योगदा सत्संग ध्यान मंडळीतर्फे डॉ. कुर्तकोटी सभागृहात सोमवारी (दि.२८) योगदा संत्सग सोसायटी आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होेते. ते म्हणाले. आपण योग आणि ध्यानसाधनेमुळे संपूर्णपणे मन:शांती प्राप्त करू शकतो. त्यामुळे अंतर्गत व बाह्य आरोग्य सुरक्षित होण्यास मदत होते. प्रणयम, योग व ध्यानसाधनेमुळे मिळणाऱ्या ऊर्जेमुळे व्यक्तीला आंतरिक सुरक्षा प्राप्त होऊन तुम्ही थेट ईश्वरी शक्तीच्या संपर्कता येत असल्याने सर्व प्रकाराच्या भयापासून मुक्ती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ब्रह्मचारी स्वामी ज्ञानानंद व स्वीमी स्वरूपानंद उपस्थित होते.

Web Title:  Yoga, meditation can be achieved by fear of fear: Swami Smarananand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.