सर्वांगीण विकासासाठी योगाभ्यास करावा : प्रज्ञा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:08 AM2018-01-25T00:08:22+5:302018-01-25T00:08:45+5:30
विद्यार्थ्यांनी लहानपणा-पासूनच ओंकार आणि सूर्यनमस्कारा-सोबत योगाभ्यास मनापासून केल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो. सर्वांगीण विकासा-साठी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण-पदक विजेत्या प्रज्ञा पाटील यांनी केले.
सिन्नर : विद्यार्थ्यांनी लहानपणा-पासूनच ओंकार आणि सूर्यनमस्कारा-सोबत योगाभ्यास मनापासून केल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो. सर्वांगीण विकासा-साठी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण-पदक विजेत्या प्रज्ञा पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सिन्नर संकुलातर्फे आयोजित शतकमहोत्सवी वर्षात एक कोटी सामूहिक सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती सोहळ्यात त्या बोलत होत्या. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर कॅनडा येथील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी जयंत लेले, दीपाली लेले, प्रकाश पंगम, शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, श्रीराम क्षत्रिय, प्राचार्य दिलीप वाणी, मुख्याध्यापक यशश्री कसरेकर, सुरेखा जेजुरकर, तोताराम घुगे, अरुणा चोथवे, सुनीता कोथळकर, अनिल पवार, जागृती टिळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. जयंत लेले यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करत सूर्यनमस्कार ही तुमची जीवनशैली बनावी आणि आपल्या अंत:करणात असलेल्या गुणांना संधीची वाट मोकळी करून देण्यात मदत मिळावी, असे नमूद केले. याप्रसंगी प्रकाश पंगम यांच्या हस्ते गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानपत्र संकुलातील सर्व मुख्यध्यापकांना वितरित करण्यात आले. सूर्यनमस्कार हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग असून, ही कला जीवनात आचरणात आणावी, असे आवाहन श्रीपाद देशपांडे यांनी केले. यावेळी संकुलातील सुमारे १७०० विद्यार्थ्यांनी दोन आवर्तनात २६ सूर्यनमस्कार मंत्राच्या जयघोषात सादर करत प्रात्यक्षिकातून ४४ हजार २०० सूर्यनमस्कार घालून भगवान सूर्य-नारायणाची वंदना केली. याप्रसंगी अनिल देशपांडे, अनुप्रिता देशपांडे, रेणुका शेलार, जागृती भंडारी, ज्योत्स्ना केदार उपस्थिती होती. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले, तर तोताराम घुगे यांनी आभार मानले. जागृती टिळे यांनी प्र्रास्ताविक केले.