योगेंद्र यादव यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 03:26 PM2018-12-21T15:26:34+5:302018-12-21T15:26:45+5:30

पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 Yogendra Yadav's interaction with Pimpalgaon farmers | योगेंद्र यादव यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांशी संवाद

योगेंद्र यादव यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांशी संवाद

Next
ठळक मुद्देयेथील बाजार समिती मध्ये सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय किसान संघर्ष समि ती चे स्वराज्य इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.योगेद्र यादव आपल्या टिमसह दाखल झाले. बाजार समिती च्या कामाची पहाणी करत थेट शेतकरी वर्गाशी संवाद साधला. या वेळी यादव यांनी शासनाचा शेतकरी बा


पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शेतकरी हा आधिच अतिदक्षता विभागात दाखल केला आणि आता काल कांदा अनुदान व कर्जमाफीचे इंजेक्शन देत बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीत कांदाचा भाव वाढला तर सरकार कोसळते. ईकडे शेतकºयांना भाव मिळत नाही तर त्याची चेष्टा करतात. आम्हाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव द्यावा, कृषी धोरणावर का अधिवेशन बोलावले जात नाही.असा प्रश्न करून ते म्हणाले, शासनाने शेतकरी वर्गासाठी एक लाख कोटींचा निधी ची तरतूद केली पाहिजे.यावेळी शेतकरी वर्गाच्या मालाला भाव मिळत नाही अशा वेळी या निधीचा वापर होणे आवश्यक आहे. आताच कांदा बाबतीत घोषणा केली दोनशे रूपये अनुदान परंतु त्याच्या अटी व शर्ती घालुन दिल्या. आम्हाला अनुदान नको हमी भाव द्यावा नाहितर हमी भावाने सरकार ने कांदा खरेदी करावा. नरेंद्र मोदी यांच्या फसव्या घोषणांनी आता वैतागून गेले आहे .हे फक्त व्यापारी धार्जिने सरकार आहे शेतकरी बाबतीत यांना कळवळा अजीबात नाही. फक्त जातीधर्माच्या नावाखाली,मंदीराच्या नावाखाली राजकारण चालु आहे मजूर शेतकरी च्या नावाखाली राजकारण कोणीच करत नाही.दहा वर्षापासून कॉँग्रेसच्या काळात स्वामीनाथन आयोगाची मागणी होती. राहुल गांधी सुद्धा या बाबतीत अजही गप्प च आहेत. या साठी शेतकरी वर्गानी वज्रमुठ करून शासनाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केल.े या वेळी सभापती दिलीप बनकर,अविक शहा,सुभाष नोमरे, आदि उपस्थित होते.

(21योगेन्द्र यादव)

Web Title:  Yogendra Yadav's interaction with Pimpalgaon farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.